Press "Enter" to skip to content

बिल्डिंगचे बांधकाम रखडले

बिल्डरकडून फसवणूक न्याय न मिळाल्यास ज्ञानेश्वर पाटील यांचा आत्मदहनाचा इशारा

सिटी बेल ∆ पेण ∆ प्रतिनिधी ∆

पेण नगरपालिका हद्दीतील बोरगांव रोड लगत असणाऱ्या गुरुदत्त रियालिटी बिल्डिंगचे बांधकाम अनेक महिने झाले तरीही तयार होत नसून बुक केलेल्या फ्लॅटचा ताब्यात मिळत नसल्याने सदर बिल्डर कडून आपली फसवणूक झाली असल्याचे ज्ञानेश्वर नामदेव पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

१९ सप्टेंबर २०१६ रोजी पेण नगरपरिषदेच्या हद्दीतील बोरगाव रोड येथील सर्व्हे नंबर ३८३/२ ही मिळकत विकसीत करण्याकरीता २०१७ साली सदर मिळकती मध्ये बिल्डरने बिल्डिंगचे बांधकाम सुरु केले.यामध्ये ज्ञानेश्वर पाटील यांनी १७ लाख रुपये किंमतीचा फ्लॅट विकत घेण्यासाठी यांनी बिल्डर साकाल याला ८० टक्के रक्कम देऊनही त्यांना वेळेत फ्लॅटचा ताबा न देता तो उडवा उडविची उत्तर देवू लागला याबाबत आम्ही अधिक तपासणी केली असता बिल्डरने खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून रेरा चा प्रमाणपत्र मिळवला आहे.त्यामुळे आपली फसवणूक झाल्याने ज्ञानेश्वर पाटील यांनी बिल्डर साकाल याचा विरोधात पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.मात्र आपल्याला न्याय मिळत नसल्याने त्यांनी शेवटी आत्मदहनाचा इशारा या पत्रकार परिषदेत दिला आहे.

यामध्ये सदर बिल्डरने अनेकांना फसविले असून त्यांच्यावर इतरही ठिकाणी तक्रारी दाखल आहेत.परंतु तरीही कोणतीही कारवाई होत नसल्याने साकाल बिल्डर हा राजरोसपणे उजाल मातेने फिरत आहे. त्यामुळे त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा आपण आपल्या जिवाचे बरेवाईट करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

याबाबत पेण पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत बिल्डर साकल यांनी बिल्डिंगचे काम त्वरित पूर्ण करून फ्लॅट धारकांना फ्लॅटचा ताबा लवकरात लवकर देण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.