Press "Enter" to skip to content

प्रकल्पाच्या कामासाठी आणलेले ८ पाईप गायब

धाटाव औद्योगिक वसाहतीच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात १ लाख ८ हजारांची चोरी

सिटी बेल ∆ धाटाव ∆ शशिकांत मोरे ∆

रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीत पोलिस ठाण्या नजीकच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात १ लाख ८ हजारांची चोरी झाली आहे. सदर याठिकाणी सुरू असलेल्या एका प्रकल्पाच्या कामासाठी आणलेले ८ पाईप अज्ञात इसमाने चोरून नेल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

रोहा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,धाटाव औद्योगिक वसाहतीच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात एई रेशन टाकीच्या एका प्रकल्पाच्या कामासाठी आणलेले १०० एन बी चे ४८ मीटर लांबीचे २२६२ रू प्रमाणे १ लाख,८ हजार रुपये किमतीचे एकूण ८ नग कंपनीच्या पूर्व बाजूस मोकळ्या जागेतून कोणीतरी अज्ञात इसमाने गायब केले आहेत.

याबाबत प्रसाद दीपक राईज (२३) मु.वरसे ता.रोहा यांनी पोलिसात फिर्याद दिली असून गुन्हा र. नं.१६७/२०२२ भा. द. वि.कलम ३७९ अन्वये रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटना ही हाकेच्या अंतरावर असलेल्या धाटाव पोलीस ठाण्यानजीक घडली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान घटनेची रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.सी.जे.कुथे यांच्या समवेत सहकारी वर्ग अधिक तपास करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.