Press "Enter" to skip to content

रायगड डिस्ट्रिक्ट अमेच्यूर फुटबॉल असोसिएशन उरण झोन 3 च्या इन्चार्ज पदी उरणचे सुपुत्र प्रवीण तोगरे यांची निवड

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆

रायगड डिस्ट्रिक्ट अमेच्यूर् फुटबॉल असोसिएशन (RDAFA)चे बैठक खोपोली मुळगाव येथे संपन्न झाली.अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित पदाधिकारी उपाध्यक्ष रामदास शेंडे आणि शशिकांत पाटील, सेक्रेटरी कुलदीपक शेंडे, जॉईंट सेक्रेटरी केतन शेंडे, व सी.ई.ओ. किरण आंचन यांच्याद्वारे रायगड डिस्ट्रिक्ट अमेच्यूर फुटबॉल असोसिएशन उरण झोन 3 च्या इन्चार्ज व सिलेक्शन कमिटी मध्ये उरणचे सुपुत्र, क्रीडा प्रशिक्षक प्रविन संग्राम तोगरे यांची निवड करण्यात आली आहे.

उरण तालुक्यातील फुटबॉल पटू व उरणच्या नागरिकांनी या निवडीचे मोठ्या आनंदात स्वागत केले आहे. उरण तालुक्यातील फुटबॉल पटू (खेळाडू )आता ऑल इंडीया फुटबॉल फेडेरेशन(AIFF)आणी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) चा अंतर्गत होत असलेल्या सामन्यामध्ये सिलेक्शन द्वारे भाग घेऊ शकतील.

प्रवीण तोगरे यांच्या निवडीमुळे उरण मधील खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकणार आहेत त्यामुळे उरण मधील नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.प्रवीण तोगरे यांची कमिटी मध्ये सदस्य म्हणून तसेच इन्चार्ज म्हणून निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.