सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
कर्नाळा अभयारण्याच्या पायथ्याशी असलेल्या मौजे कल्हे हद्दीत मोरटाका आदीवासीवाडीत गेल्या कित्येक वर्षे सर्व्हे 176/7 जागी आदीवासी समाज राहत आहे.याजागेवर आदीवासी बांधवांनी आंबा, काजू,केळी वगैरे फळझाडे लावलेली आहेत.तर पावसाळी भाजीपाला लावून आदीवासी बांधव आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.परंतू धनाढ्यांची या जागेवर नजर असून पैशाच्या जोरावर आम्हा गोरगरीब आदीवासी बांधवांना हटविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मोरटाका आदीवासीग्रामस्थ गणपत लहू पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

मोरटाका येथील सर्वे नं.176/5 व 176/7 या जमिनीतून जंगलाकडे जाणारा पुर्वा पार वहिवाटीचा रस्ता तसेच स्थानिक आदीवासी बांधवांचा जाण्या येण्याचा रस्ता आहे.हा रस्ता खुला ठेवण्याचा उल्लेखही सातबा-यात आहे.परंतु धनाढ्य लोक गोरगरीब आदीवासीवर अन्याय करुन दमदाटी करत सदर रस्ता बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याचे येथील ग्रामस्थ गणपत लहू पवार यांनी सांगितले.
दरम्यान मोरटाका असेसमेंटधारक गणपत लहू पवार, गोकुळ जगन नाईक, दत्ता कृष्णा वाघमारे,बबन भाग्या पवार यांना न्याय न मिळाल्यास कष्टकरी मुक्ती संघटनेच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.








Be First to Comment