सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
कर्जत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी वैभव गारवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांनी 2 सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.
कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांची 2 मे 2022 रोजी बदली झाली, त्यांच्या जागी कर्जत नगरपरिषदेवर नवीन मुख्याधिकारी यांची नियुक्ती न झाल्याने माथेरानच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांना 4 मे 2022 रोजी कर्जत नगरपरिषदेचा अतिरिक्त कार्यभार दिला.
डॉ. पंकज पाटील यांच्या जागी ठाणे जिल्ह्यातील शहापूर नगरपंचायत मधून कर्जत नगरपरिषदेवर मुख्याधिकारी म्हणून वैभव गारवे यांची नियुक्ती झाली आहे, त्यांनी 2 सप्टेंबर रोजी कर्जत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्विकारला आहे, गारवे यांनी यापूर्वी रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे काम केले आहे.








Be First to Comment