सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
डोंबिवली नागरी सहकारी बँक या मल्टी स्टेट शेड्युल सहकारी बँकेचा 52 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कर्जत शाखेमध्ये वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बँकेच्या असिस्टंट जनरल मॅनेजर शलाका प्रभू उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी कर्जत मधील उद्योजक गणेश वैद्य, सीए विक्रम वैद्य, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, लेखक कवी अभिनेते राहुल वैद्य, बी एस एफ चे जवान गणेश लोवंशी, कर्जत तालुका नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक नंदकुमार मनेर, विजयकुमार गोखले, वृषभ सुपर मार्केट चे मालक रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष जितेंद्र ओसवाल, चेतन शहा, पिनाकीन शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

कर्जत शाखेच्या व्यवस्थापक संज्योत वझे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी बँकेचे कर्मचारी केतकी कुडे, भाग्यश्री ओक, माधव लोवंशी, विशाल बेतूरकर, शंकर खोटरे आदी उपस्थित होते.








Be First to Comment