Press "Enter" to skip to content

डॅा.शितल रसाळ कर्जतचे नवीन तहसिलदार !

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

कर्जतचे तहसिलदार विक्रम देशमुख यांची नुकतीच ठाणे येथे बदली झाली आहे, त्यांच्या जागी तहसिलदार म्हणुन डॅा. शितल रसाळ यांनी काल कार्यभार स्विकारला आहे.

कर्जत तहसिल कार्यालयात कार्यरत असणारे तहसिलदार विक्रम देशमुख यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यामुळे कर्जतचे तहसिलदार पदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागुन होते. अखेर कर्जतचे नवीन तहसिलदार डॅा. शितल रसाळ यांची वर्णी लागली आहे.

कर्जत वरुन नुकतीच बदली झालेले तहसिलदार विक्रम देशमुख यांनीही येथे उल्लेखनीय कामगिरी होती. त्यामुळे त्यामुळे नवनिर्वाचित तहसिलदार डॅा. शितल रसाळ हेही येथे वाखाणण्याजोगे काम करतील असा विश्वास व्यक्त होत आहे. कर्जतमधे नुकताच हजर झालेले तहसिलदार डॅा. शितल रसाळ यांनी यापुर्वी रायगड जिल्ह्यातील तळा, तसेच ठाणे, बुलढाणा जिल्ह्यात काम केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.