Press "Enter" to skip to content

पनवेल तालुक्यातील बेलवली येथे घरफोडी

घरफोडीत लाखों रुपये किंमतीचा ऐवज लंपास

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆

पनवेल तालुक्यातील बेलवली येथे चोरट्यांनी घरातील बेडरूमच्या खिडकीचे गज वाकवून ७ लाख ९६ हजार ६०० रुपयांची घरफोडी केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेलवली येथील रमेश पाटील यांच्या घरी ही चोरी झाली.बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्या-चांदीचे दागिने व मोबाईल असा एकूण ७ लाख ९६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे . या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर व गुन्हे शाखेच्या पथकाने घटना स्थळी जाऊन पाहणी केली आहे . परिसरातील सी. सी टीव्ही फुटेज व गुप्त बातमीदाराच्या आधारे या चोरट्यांचा शोध सुरु आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.