सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
कर्जत विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून जलजीवन मिशन अंतर्गत कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे 40 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळवली आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील शेलू बांधीवली पाणी पुरवठा योजनेस 12 कोटी 5 लक्ष 82 हजार 773 रुपये, मोग्रज प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस
13 कोटी 21लक्ष 42 हजार 335 रुपये, आणि पाषाणे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस साठी 14कोटी 37 लक्ष 7 हजार 924 रूपयाचा असा तीन योजने करिता सुमारे 39 कोटी 64 लक्ष 36 हजार 32 रुपयांचा निधी प्राप्त केला आहे.








Be First to Comment