Press "Enter" to skip to content

कर्जत मधील गणेश घाटाची नगराध्यक्षांकडून पाहणी

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

कर्जत शहरातून वाहणा-या उल्हास नदीवर गणेश घाट नंबर एक व घाट नंबर दोन या दोन घाटांची नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे.

दीड दिवसाच्या गणरायाचे 1 सप्टेंबर रोजी विसर्जन असल्याने कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीवर पाणी अडवण्यासाठी झडपा बसवण्यात आल्या आहेत, गणेशोत्सवापूर्वी कर्जत नगर परिषदेने नदीवरील सर्व घाटावरील गवत काढून साफसफाई केली आहे, घाटावर लाईटची सुविधा करण्यात आली आहे, या सगळ्या पूर्वतयारीची पाहणी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल,नगर परिषदेचे अभियंता मनिष गायकवाड, सुदाम म्हसे,सुनील लाड, उल्हास नदी स्वच्छता अभियान चे समीर सोहनी यांनी केली.

गणेश उत्सव आनंदाने साजरा व्हावा, नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, जंतुनाशक फवारणी, पावडर फवारणे, निर्मल्या टाकण्यासाठी सोय करण्याची सूचना नगराध्यक्ष जोशी यांनी संबधीत कर्मचारी वर्गाला केल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.