Press "Enter" to skip to content

“सिंगापूरकरांनी गिरवले व्यक्तिचित्रणाचे धडे !

पराग बोरसे यांच्या चित्र-कार्यशाळेला सिंगापूर मध्ये उदंड प्रतिसाद

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

सिंगापूरकरांनी गिरवले व्यक्तिचित्रणाचे धडे!”पराग बोरसे यांच्या चित्र-कार्यशाळेला सिंगापूर मध्ये उदंड प्रतिसाद मिळाला.

कर्जतचे चित्रकार पराग बोरसे यांची व्यक्तिचित्रणाची कार्यशाळा नुकतीच सिंगापूर मध्ये पार पडली. 22- 23 आणि 24 ऑगस्ट या दिवसांमध्ये ही कार्यशाळा “माय आर्ट-स्पेस,ईस्ताना पार्क, सिंगापूर या प्रसिद्ध कलादांना मध्ये आयोजित करण्यात आली होती. दर दिवशी सहा तास असे तीन दिवस ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला भारतीय आणि सिंगापूरकर विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली. कार्यशाळे दरम्यान पराग बोरसे यांनी सॉफ्ट-पेस्टल या माध्यमातून एक व्यक्तिचित्रण पूर्ण करून दाखवले.

उपस्थित विद्यार्थ्यांनीही बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली एक व्यक्तिचित्रण पूर्ण केले. पिवळ्या रंगाचा फेटा घातलेल्या मेंढपाळाचे हे व्यक्तिचित्र होते. व्यक्तिचित्रण करताना अमूर्त आकारांचे महत्त्व या विषयावर पराग बोरसे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.