Press "Enter" to skip to content

माउंट नुन शिखर सर केलेल्या संतोष दगडें चे कर्जतमध्ये जंगी स्वागत

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कर्जतचे गिर्यारोहक संतोष दगडे यांनी माउंट नुन शिखरावर भारताचा तिरंगा ध्वज फडकवून मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचे कर्जतमध्ये आगमन होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दगडे हे 7134 मीटर उंची वरील शिखर सर करणारे रायगड जिल्ह्यातील पाहिले गिर्यारोहक ठरले आहेत.

हेमंत जाधव ( बदलापूर ) यांच्या कुशल नेतृत्वाखाली संदिप मोकाशी ( डोंबिवली ), धनाजी जाधव ( बदलापूर ) व कर्जत चे गिर्यारोहक संतोष दगडे यांनी अवघड समजले जाणारे माउंट नुन हे शिखर यशस्वीपणे सर केले. ते कर्जतला आले तेंव्हा त्यांचे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका जवळ उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

यावेळी त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांनी त्यांचे औक्षण केले. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी त्यांचा शाल, पुष्पहार देऊन सन्मान केला. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक विवेक दांडेकर, शिवशंभो युवा हायकर्सचे विकास चित्ते, निवृत्त सैनिक विनायक उपाध्ये, प्रसाद पाटील, महेंद्र चंदन, दीपक बेहेरे, सुनील सोहनी, दिगंबर कांबळे आदी कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.