सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा तर्फे रसायनी पाताळगंगा परिसरातील १५ शाळेच्या १० वी व १२ वी च्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या एकूण ३२ विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात कार्यक्रम मोहोपाडा येथील प्रिआ स्कूलच्या सभामंडपात पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रिलायन्स फौंडेशनचे प्राचार्य डॉ सुहास सबनीस सर उपस्थित होते .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरीयन होणावळे सर यांनी खूप मेहनत घेतली व त्यांना मदत करणाऱ्या रो. देवेंद्रजी व रोट्रॅक्ट प्रेडिसेंट समृद्धचे अध्यक्ष रो.अमित शाह यांनी मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार मानले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. बाळकृष्ण होणावळे सर यांनी फार चांगल्या पद्धतीने केले. या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष रो. अमित शाह फर्स्ट लेडी मित्तल शाह,सेक्रेटरी रो.डॉ धीरज जैन,सहायक सेक्रेटरी रो. विजय पाटील व जयश्री पाटील, खजिनदार रो. देवेंद्रजी,माजी अध्यक्ष रो. गणेश काळे व शारदा काळे,रो. गणेश वर्तक,रो. आल्हाद पाटील,रो. दीपक चौधरी,रो. सुनील भोसले,रो. गणेश मेनसे,रो. शानबाग काका,रो. मेघा कोरडे व रमाकांत कोरडे,रो. डॉ लेखा उचिल ,रो. सुशांत उचिल,रो. संदीप साबळे,रो.राजू गायकवाड,रो. बाळकृष्ण होणावळे व अनुराधा होणावळे तसेच रोट्रॅक्ट प्रेसिडेंट समृद्ध उचिल ,सेक्रेटरी नेहा मरीयम अन्य काही रोट्रॅक्टर उपस्थित होते.








Be First to Comment