Press "Enter" to skip to content

शिवसेना शाखेच्या वतीने नागोठणे महावितरण अधिकाऱ्यांस निवेदन

सिटी बेल ∆ नागोठणे ∆ याकूब सय्यद ∆

नागोठणे शहर व विभागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागोठणे नगरीचे प्रथम नागरिक कर्तव्य दक्ष सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांच्या नेतृत्वाखाली नागोठणे येथील वीज वितरण कनिष्ठ अभियंता वैभव गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

त्या निवेदनात असे म्हटले आहे की, येणाऱ्या गणपती हा आनंदाचा सण या सणासुदीला गावातील लोकांना वीज पुरवठा सुरळीत करावा विजेअभावी कोणत्याही समस्या त्यावेळी उदभवू नये एम एस ई बी नागोठणे येथील कनिष्ठ अभियंता वैभव गायकवाड यांनी लक्ष केंद्रित करावे अशा स्वरूपाचे निवेदन सरपंच मिलिंद धात्रक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शाखेच्या वतीने महा वितरण अधिकाऱ्यास देण्यात आले.

त्यावेळी नागोठणे ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद धात्रक, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य मोहन नागोठणेकर, ज्ञानेश्वर साळुंके, सदस्य शिवसेना शाखाप्रमुख धनंजय जगताप, उपशाखाप्रमुख बाळू रटाटे, शहर संघटक प्रकाश मेस्त्री, एडवोकेट प्रकाश कांबळे, कैलाश गोरे, मंदार मोरे, प्रसाद कोळी, युवा सेना शाखा अधिकारी दिनेश वादळ, रुपेश नागोठणेकर, अमोल ताडकर, संतोष कुसाळकर, आदी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी त्या कार्यालयांमध्ये निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.