सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆
रोटरी क्लबचा डिस्ट्रिक्ट मेंबरशिप अवॉर्ड प्रोग्राम नुकताच पुणे येथील भंडारकर रोड भागात असलेल्या पीवायसी हाॅल मध्ये रोटरियन राजू सुब्रमण्यम व डी.जी. डाॅ. अनिल परमार , मंजू फडके, आगामी डी.जी. इलेक्ट यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
डिस्टिक मेंबरशिप कमिटीचे मेंबर विक्रम जैन, रोहा रोटरी क्लबचे प्रेसिडेंट सुरेंद्र निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. याचवेळी सॅटॅलाइट क्लब नागोठणेचे चेअरमन सचिन मोदी यांनी मेंबरशिप मध्ये चांगला सहभाग दिल्यामुळे व रोटरी क्लब तर्फे विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवल्यामुळे सचिन मोदी यांचाही विशेष सत्कार यावेळी आगामी डी.जी. इलेक्ट मंजू फडके यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला रोहा रोटरी क्लबचे प्रेसिडेंट इलेक्ट संजय नारकर, नागोठणे रोटरी क्लबचे रोटरीन गौतम जैन, रोटरीन मांगीलाल चौधरी व इतर जिल्ह्यातील डिस्ट्रिक्ट ३१३१ चे रोटरीन सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन मोदी हे राजकीय व सामाजिक दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांना हा सन्मान मिळाला असून या सन्मानासाठी पेण-सुधागडचे आमदार रवीशेठ पाटील यांनी सचिन मोदी यांचे फोन द्वारे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.








Be First to Comment