सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी कृष्णा गोगाटे यांनी 32 वर्षे बॅकेची सेवा केली.अखेर साठ वर्षांच्या कालावधीनंतर ते सेवानिवृत्त झाले.यावेळी रायगड बॅक कर्मचाऱ्यांनी त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.याप्रसंगी मोहोपाडा रायगड बॅक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा पहावयास मिळाले.
आपल्यातून आपला सहकारी कर्मचारी आपणापासून सेवानिवृत्ती घेऊन चालल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य लोप पावल्याचे दिसून आले.याप्रसंगी बॅक मॅनेजर जनदीश महादेव म्हात्रे,जानू रघुनाथ दरवडा,सचिन महादेव घरत, गणेश सुदाम पाटील, हर्षद जयंतीलाल शहा,धनाजी भाजीवाला आदी उपस्थित होते.
सेवानिवृत्त कृष्णा कोकाटे यांचा स्वभाव शांत,सरळ आणि संयमी होता.गेल्या 32 वर्षांत त्यांनी रायगड बॅकेत काम करत असताना कामात चोखपणा ठेवला. खातेदारांना कोणतीही अडचण असल्यास सहकार्य करणे यातच ते समाधान मानत.असे कृष्णा कोकाटे रायगड बॅकेतून सेवानिवृत्त झाल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.








Be First to Comment