Press "Enter" to skip to content

कैरे गावातून २१ वर्षीय युवक बेपत्ता

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसरातील कैरे गावात राहणारा एकवीस वर्षींय युवक बेपत्ता झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कैरे येथे राहणारा शिवदत्त रामजित भुईंया याचा मेहुणा कामेश्वर गोपाळ भुईंया (वय 21) हा रुममधून कोणास काहीएक न सांगता निघून गेला.कामेश्वर भुईंया हा रंगाने सावळा,उंची पाच फुट,चेहरा उभट,केस टक्कल केलेले असे वर्णन असून अंगात फुल बाह्याचा शर्टं,ट्रेक पॅन्ट, गळ्यात काळ्या रंगाचा धागा घातलेला आहे.याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक जे.एस.बैकर करीत आहेत.अशा वर्णंनाचा युवक कुठे आढळल्यास रसायनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.