Press "Enter" to skip to content

श्रावण महिन्यात देवदर्शन

माजगांव सरपंच गोपीनाथ जाधव यांची अल्प दरात देवदर्शन घडविण्याची परंपरा कायम

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆

दर वर्षी श्रावण महिन्यांचे आगमन होताच,प्रत्येकाच्या मनामध्ये देवदर्शन करण्याची भावना निर्माण होत असते.हिंदू संस्कृतीत श्रावण महिना अत्यंत पवित्र मनाला जात असल्यामुळे, या महिन्यात पावसाचा जोर कमी झालेला असतो.त्याच बरोबर हा महिना धर्मिक सणांचा असल्यामुळे या महिन्यामध्ये मासाहारी वर्ज्य केले जात असते.यामुळे शरीराबरोबर मन हि पवित्र होत असते.

अशा श्रावण महिन्यामध्ये पर्यटक स्थळांना भेट दिल्यानंतर मन प्रसन्न होऊन जाते.त्या ठिकाणी असलेला वातावरण मनाला भुरळ घातली जाते.तसेच पावसाच्या आगमनाने सर्वत्र ठिकाणी चैतन्य निर्माण झाले असते.यावेळी हे सर्व दृश्य पाहताच मनाला समाधान मिळत असतात. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक पर्यटक स्थळ आणि देवदर्शन घेत असतात.

ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक स्वताच्या जवळ असलेले वाहन घेवून जाणे पसंद करीत असतात.तर कोणी खाजगी वाहन म्हणजे,बस तर ट्रवेल्स करीत असतात.कारण आपल्या भारत देशात अनेक अशी धार्मिक स्थळ ,पर्यटक स्थळ आहेत कि ज्यांची आपण कल्पना करू शकत नाही.राजा -महाराज यांनी बांधलेली वास्तू धार्मिक स्थळे अजूनही काही जशीच्या तशीच आहे.ते पाहताच क्षणी मन प्रसन्न होऊन जाते.उत्तम कलाकुसर आणि कोरीव काम यामुळे आपली भारतीय संस्कृती कल्पना येते.आपल्या भारतामध्ये असे अनेक शिल्प कोरीव आणि नक्षी कामाचे नमुने आहेत.कि पाहताच क्षणी मनाला समाधान मिळत असते.

श्रावण महिन्यात नागरिकां देव दर्शन अल्प दरात व्हावे या या दृष्टीकोणांतून ग्रूप ग्राम पंचायत माजगांव सरपंच गोपीनाथ जाधव दर वर्षी ग्रामस्थांना देव दर्शनास घेवून जात असतात.असे मत जनार्धन जाधव,पी.के जाधव, शांताराम जाधव,तुकाराम जाधव,के.एल जाधव,किशोर जाधव,शांताराम ठोंबरे यांनी प्रतिनिधी बोलताना व्यक्त केले.

ग्रूप ग्राम पंचायत सरपंच माजगांव गोपीनाथ जाधव गेले अनेक वर्षापासून आम्हा ग्रामस्थांना अल्प दरात देवदर्शन घडवित असतात.यामुळे दर वर्षी आम्हास विविध धार्मिक स्थलांकडे दर्शन घडत असते. – जनार्धन जाधव,ग्रामस्थ , आंबिवली

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.