Press "Enter" to skip to content

नवमातांना राजगिरा लाडू व खजूर पाकिटे वाटप

स्तनपानाचे महत्व याबाबत कर्जत इनरव्हील क्लबची जनजागृती

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

ऑगस्ट महिन्यात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो, त्याचा भाग म्हणून इनरव्हील क्लब कर्जतच्यावतीने जनजागृती अभियान राबविण्यात आले.

स्तनपानाला अमृतपान असेही म्हटले जाते दरवर्षी इनरव्हील जनजागृती अभियान राबविते, याबाबत कर्जत उपजिल्हा रुग्णालयात ब्रेस्टर फिडींग या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, इनरव्हील क्लबच्या आय एस ओ प्राची चौडीए, ज्योत्स्ना शिंदे,सरस्वती चौधरी,सुलोचना गायकवाड,वैशाली दांडेकर, सुप्रिया गिरी, दिपा खनाल, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज बनसोडे, डॉ. संगीता दळवी उपस्थित होते.

आईच्या दूधा मध्ये रोग प्रतिकार क्षमता जास्त असते,तसेच स्तनपान हे केवळ कर्तव्य म्हणून न पाहता एक सुदृढ पिढी घडविण्यात आपला मोलाचा वाटा आहे हे नवमातांनी लक्षात घ्यायला हवे असा संदेश इनरव्हील क्लबच्या वतीने मार्गदर्शनात देण्यात आला, यावेळी नवमातांना राजगिरा लाडू, व खजूराची पाकीटे देण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.