नगरसेविका अरुणा दाभणे यांच्या प्रयत्नाने बाँम्बे ब्रेवरिज कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली मदत

सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी #
कोरोना विषाणूने संपुर्ण जगात हाहकार माजविला आहे. या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारने लॉकडाऊन हा रामबाण उपाय शोधला होता. पण तरिही कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास यश येताना दिसून येत नाही. नागरिकांत कोरोनाची दहशत असून घरात आपल्याला सुरक्षित केले आहे. पण त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या निराधार, रोजनदारी, मजूर , गोरगरीब, झोपडपट्टी नागरिकांची उपासमार होताना दिसून येत आहे. अशा गोरगरिब मजूर कामगारांची उपासमार होऊ नये म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका अरुणा दाभणे यांच्या प्रयत्नातून बाँम्बे ब्रैवरिज लि या कंपनीच्या माध्यमातून पालेखुर्द विभागात १५० नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले आहे.
त्यांनी गेल्या पाच महिन्यांपासून सुरू ठेवलेल्या स्तुत्य कार्यक्रमामुळे त्यांचे गोरगरिब, झोपडपट्टी व मजूरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोरोना संसर्ग विषाणूची साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. आता शिथिलता करण्यात आसी असली तरी त्यावर अनेक मर्यादा आहेत त्यामुळे ८० टक्के उद्योग सुरू करण्यात आले नाहीत तर काही उद्योग सुरू आहेत त्यांनी कामगार कपात केल्याने अनेकांचे रोजगार गेलै आहेत .परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जो तो रोजी रोटीच्या शोधात आहे अशा निराधार महिला, अपंग व कामगार उपासी राहू नयेत म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका अरुणा दाभणे यांनी लाँकडाऊन सुरू झाल्यापासून आज पर्यत हजारो नागरिकांना धान्य व यंत्रसामुग्रीचे वाटप केले आहे. त्यांच्या व त्यांचे पती किरण दाभणे यांच्या प्रयत्नातून बाँम्बे ब्रेवरिज लि कंपनीतून १५० लोकांना महिनाभर पुरेल असे धान्याचे कीट वाटप करण्यात आले.
तळोजा औद्योगिक विभाग असताना येथे कोरोनाने शिरकाव करू नये म्हणून या विभागातील नगरसेवक व पालिका कर्मचारी जातीने लक्ष देत आहेत. यासाठी पालिकेचे आरोग्य यंत्रणा आपले कर्तव्य चोख पार पाडत आहे. असे अरुणा दाभणे यांनी सांगितले. कोरोनाच्या महामारीत जर आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर काम असेल तरच बाहेर पडा. मास्क घालूनच बाहेर पडा ! जास्तीत जास्त साबनाने हात व तोंड साप धुवा असे आवाहनही नगरसेविका दाभणे यांनी केले.
या वेळी बाँम्बे ब्रेवरिज कंपनीचे युनिट हेड स्वप्नील घाडगे, व्यवस्थापक अमृत साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमाकांत दाभणे मा.उपसरपंच शशिकांत गोंधळी मा.उपसरपंच प्रकाश वागूस्कर किरण दाभणे रविंद्र दाभणे विजय दाभणे रोशन काठावले अनिल भोईर सुजल दाभणे मनोज जगताप आदी मान्यवर उपस्थीत होते.






Be First to Comment