किशोरभाई जैन मित्र मंडळाच्या दहीहंडीचा वरवठणेचा श्री चौंडेश्वरी माता गोविंदा पथक मानकरी
सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆
शिवसेना शाखा व किशोरभाई जैन मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने
नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौकात बांधण्यात आलेल्या भव्य-दिव्य अशी दहीहंडी फोडण्याचा मान वरवठणेतील श्री चौंडेश्वरी माता गोविंदा पथकाने मिळविला. पहिल्याच प्रयत्नात ७ थर लावल्याने वरवठणे गोविंदा पथकाला प्रथम क्रमांकाचे ३१ हजार १११ रूपयांचे पारितोषिक व कै. संतोष (आण्णा) साळुंखे चषक देऊन शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख किशोरभाई जैन यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी विभागातील तसेच शहारातील सर्व गोविंदा पथकांनी उपस्थित दर्शवली.

यावेळी नागोठणे ग्रामपंचायतीचे सरपंच डाॅ. मिलिंद धात्रक, उप तालुका प्रमुख गणपत म्हात्रे, दिपक पाटील, युवा नेते कार्तिक जैन, उपविभाग प्रमुख संजय महाडीक, ग्रा. पं. सदस्य मोहन नागोठणेकर, सुरेश जैन, मिनाक्षी गोरे, महिला पदाधिकारी धन्वतरी दाभाडे, प्रणिता पत्की, संजय काकडे, राजु पितानी, रितेष दोषी, आप्पा रावकर, नामदेव चितळकर, जीवन पत्की, विभागातील पदाधिकारी प्रशात भोईर, भाई शिर्के, सुभाष ताडकर नागोठणे शाखाप्रमुख धनंजय जगताप, दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंखे, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव प्रकाश मेस्त्री, खजिनदार अनिल महाडीक, सहसचिव दिनेश वादळ, अजित दळवी, शेखर जोगत, अल्विन नाकते, पंकज कामथे, प्रमोद नागोठणेकर, गौरव नागोठणेकर, जितेंद्र जाधव, कैलास गोरे, प्रणव रावकर, प्रसाद जोगत, बाळू रटाटे, बबन कळस, ऋत्विक माने, अविनाश भोसले, महेंद्र धामणे, प्रकाश काबंळे, गायक महेद्र कोंडे
आदींसह सर्व शिवसैनिक, पदाधिकारी, युवासैनिक, कार्यकर्ते यांच्याबरोबरच नागोठणे शहरातील ग्रामस्थ तरुण, तरुणी ही दहीहंडी पाहायला यावेळी आवर्जून व बहुसंख्येने आले होते.
गोविंदाच्या गाण्यावर सर्व गोविंदा पथक अगदी मनमोकळेपणाने नाचतांना यावेळी पहावयास मिळाले. छ. शिवाजी चौकातील या गोकुळाष्टमी उत्सवाचा कुणी आपल्या घराच्या बालकनीतून तर कुणी घराच्या छतावरून आनंद घेतला. या सोहळ्यात पाली येथील ओम साई डान्स अकॅडमीच्या तरुण व तरुणींनी सर्व प्रेक्षकांचे मनोरंजन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेक गोविंदा पथकांनी सलामी देऊन मानाचे बक्षिसही मान्यवरांच्या हस्ते स्विकारले. नागोठण्यातील हा गोकुळाष्टमी उत्सव शांतपणे व कोणतेही गालबोट न लागता साजरा होण्यासाठी नागोठणे पोलिस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक राजन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.








Be First to Comment