नागोठणे रेल्वे स्थानकाजवळ 20 वृक्षांची लागवड
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
नागोठणे लायन्स क्लबच्या वतीने नागोठणे रेल्वे स्थानक परिसरामधे २० झाडे लावण्याचा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविण्यात आला. यामधे आंबा , चिकू ,फणस याबरोबरच वड ,पिंपळ यासारखी ऑक्सीजन देणारी झाडे लावण्यात आली. यासाठी चार्टड प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन यांनी त्यांच्या वतीने सर्व झाडे देवून आपले अनमोल योगदान दिले.
नागोठणे लायन्स क्लब नेहमीच नागोठणे व पंचक्रोशीमधे विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. यामधे आरोग्य शिबीरे, अवेअरनेस कॅम्प, पर्यावरण संतुलन कार्यक्रम अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम घेत असतात. यामधीलच पर्यावरण संतुलनातील वृक्षारोपण हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डिस्ट्रिक्ट चेअरमन एमजेएफ लायन सुधाकर जवके, प्रेसिडेंट लायन संदिप नायर, सेक्रेटरी एमजेएफ लायन विवेक सुभेकर, ट्रेझरर लायन संतोष शहासने, अॅक्टीव्हीटी चेअरमन लायन यशवंत चित्रे , लायन संतोष मांडवकर, लायन सुजित महागावकर, लायन विवेक करडे हे उपस्थित होते. दरम्यान खड्डा तयार करणे पासुन संपुर्ण सहकार्य म्हणून लायन प्रकाश जैन यांचे कामगार तसेच प्रकाश जैन यांचे मॅनेजर प्रविण जैन या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
यावेळी प्रेसिडेंट लायन संदिप नायर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रथम सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले की, माझ्या या अध्यक्ष पदाच्या कारकीर्दीतील ही पहीली अॅक्टीव्हीटी असून माझ्यासाठी हे फार महत्वाचे आहे. या सारखे मी या वर्षभरात चांगले उपक्रम राबवून समाजातील तळागाळातील लोकांपर्यत पोहचण्याचा माझा मानस आहे. नागोठणे लायन्स क्लब कडून विविध आरोग्य शिबीरे घेणार असून या वर्षी जास्तीत जास्त मोतिबिंदू ऑपरेशन करुन आम्ही गरिब गरजू लोकांना मदतीचा हात देणार आहोत. यावेळी संदिप नायर यांनी या कोरोनाच्या संकटाला न घाबरता स्वतःला सावरून धिराने मात करा, मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा व आपल्या कुटूंबालाही सांभाळा. आलेले संकट निघून जाईल त्यामुळे मानसिकदृष्टया सक्षम रहा असा संदेश नायर यांनी नागरिकांना दिला आहे.






Be First to Comment