सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
तरुण वर्गापासून ते बाळ गोपाळांचा सण म्हणजे दहीहंडी शहरा प्रमाणे ग्रामीण भागात दहीहंडी सण उत्साहाने साजरा करण्यात आला.काल कृष्ण जन्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी तरुण वर्गामध्ये जणू स्पर्धा निर्माण झाल्यांचे पहावयास मिळाले.त्याच बरोबर आज वरुण राजाचा सुद्धा बाळ गोपाळावर पाण्याचा अभिषेक करीत असल्यामुळे या दहिहंडीस वेगळेच स्वरुप प्राप्त झाले होते.
उंच अशी मनोरे चे थर एकमेकांवर रचून दही हंडी फोडण्यासाठी सहकार्य केले जात असल्यांचे दृश्य या वेळी पाहावयास मिळाले.आपल्याच गटातील मुलांनी दहीहंडी फोडण्यांची जणू स्पर्धा यावेळी लहान मुलांनी पाहावयास मिळाले.आपल्याच सहकार्यांनी दहीहंडी फोडावी यासाठी प्रयत्न सुरु होते.ग्रामीण भागातील दहीहंडी उत्सव काही औरच असते.विशेष म्हणजे दहीहंडीच्या गाण्याच्या ठोक्यावर बेधुंद होवून नाचणारी तरुण वर्ग आणी बालगोपाल यांची जुगलबंदी पहावयास मिळाली.दहीहंडी फोडल्यानंतर सामुदायिक आरती घेण्यात आली.
तालुक्यातील ग्रामीण भागातील दहीहंडी जास्त उंच प्रमाणात न ठेवता अगदि दोन चार,थर तयार होतील या बाबीचा आभ्यास करून ग्रूप ग्राम पंचायत माजगांव सदस्य रमेश जाधव यांच्या पुढाकारांने दहीहंडी बांधण्यात आल्यांचे यावेळी त्यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.








Be First to Comment