सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
दहीहंडीचे वेध लागलेच होते,तब्बल दोन वर्षांनंतर साजरा होणारा हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याचा निश्चय खूप दिवसापासून बच्चे कंपनीने केला होता.त्या मध्ये मोठेही लहान बनून सहभागी झाले आणि मोठ्या उत्सवात दहीहंडी सण साजरा केला.

गेले दोन वर्षे कोरोना महामारीमुळे दहीहंडी फोडण्यावर निर्बंध घातले होते, पण आता हे सर्व निर्बंध उठविण्यात आल्याने बच्चे कंपनीचा आनंद मोठ्या प्रमाणात दिसत होता,कर्जत नगरपरिषद क्षेत्रात विठ्ठलनगर परिसरात सकाळ पासूनच बच्चे कंपनीची गडबड सुरू होती, कोण गोविंदा आला रे आला ची पट्टी डोक्याला बांधत होता तर कोण श्रीकृष्ण चा पोशाख परिधान करत होता, लहान मुलांबरोबर मोठ्या माणसाची गडबड सुरू होती, कोणी दोरखंड शोधतो आहे, कोणी त्यावर दहीहंडी बांधायच्या तयारीत आहे असे दृश्य दिसत होते अखेर दहीहंडी बांधण्यात आली आणि बच्चे कंपनीची फोडण्याची लगबग सुरू झाली कोणी कोणत्या थरात राहायचे कोणी हंडी फोडायची व्ह्यू रचना सुरू झाली हे करत असताना मोठे माणसं पुरुष, महिला बच्चे कंपनीच्या मदतीला होतीच असे वेगळे दृश्य दिसत होते, अखेर एकावर एक तीन थर करून बच्चे कंपनीने दहीहंडी फोडली त्यांच्या या आनंदात बडे कंपनी सहभागी झाली होती.








Be First to Comment