Press "Enter" to skip to content

पोलादपूरमध्ये प्रतिमा जाधव यांच्या प्रयत्नातून मंगळागौरी अन् नृत्यस्पर्धेचे आयोजन

पोलादपूरचा सहेली ग्रुप विजेता ; एकता गु्रप उपविजेता-आर्या लवंगारे नृत्यात प्रथम

पोलादपूरमध्ये प्रतिमा जाधव यांच्या प्रयत्नातून मंगळागौरी अन् नृत्यस्पर्धेचे
यश हे महिलांसाठी परंपरेनुसार प्रोत्साहन : अध्यक्षा उमा मुंडे यांचा विश्वास

सिटी बेल ∆ पोलादपूर ∆ शैलेश पालकर ∆

रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे आणि माजी पालकमंत्री  व आ.अदिती तटकरे तसेच विधानपरिषदेचे आ.अनिकेत तटकरे यांच्या कल्पकतेनुसार रायगड जिल्ह्यात पाककृती स्पर्धेनंतर मंगळागौरी आणि नृत्यस्पर्धेचे आयोजन ठिकठिकाणी करण्याचा उपक्रम राबविण्याचे ठरले आणि पोलादपूरसारख्या शेवटच्या टोकाच्या तालुक्यात रायगड महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा प्रतिमा अभंग जाधव यांनी पाककृती स्पर्धेप्रमाणेच मंगळागौरी नृत्यस्पर्धादेखील यशस्वी केल्याने या स्पर्धांचा उद्देश्य यशस्वी झाला असल्याचे मत रायगड महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा उमाताई मुंडे यांनी व्यक्त केला.

या स्पर्धेमध्ये पोलादपूर शहरातील सहेली ग्रुपने विजेतेपद तर एकता गु्रपने उपविजेतेपद पटकावले. वैयक्तीक नृत्यस्पर्धेमध्ये आर्या लवंगारे हिने विजेतेपद प्राप्त केले.

पोलादपूर शहरातील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये बुधवारी सायंकाळी महिला व तरूणींच्या प्रचंड उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगळागौरी व नृत्यस्पर्धांचा शुभारंभ रायगड महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा प्रतिमा अभंग जाधव यांच्याहस्ते पोलादपूरच्या माजी प्रभारी सभापती कांचनताई बुटाला, सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया शेठ, रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या सुमन कुंभार, तालुका अध्यक्ष सुहास मोरे, उपाध्यक्ष नरेश शेलार, तालुका सदस्य महमद मुजावर, तालुका महिला अध्यक्षा प्रतिभा पवार, शहर अध्यक्ष अजित खेडेकर, महिला संघटिका मीरा लाड व माधुरी विचारे, नितीन आरडे आणि आ.अदिती तटकरे यांचे स्वीय सचिव अनिकेत पवार आदींच्या उपस्थितीत झाले. रयत विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी यावेळी इशस्तवन गायले.

यादरम्यान, प्रदेश महिला सरचिटणीस दिपिका चिपळूणकर आणि रायगड रायगड महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा उमाताई मुंडे यांनी उपस्थिती दर्शवून स्पर्धक महिलांना प्रोत्साहित केले. यावेळी रायगड महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा प्रतिमा अभंग जाधव यांच्यासोबत प्रदेश महिला सरचिटणीस दिपिका चिपळूणकर यांनी फुगडी खेळून आनंद द्विगुणित केला. या मंगळागौरी व नृत्यस्पर्धेमध्ये दिविलमधील श्रीशक्ती ग्रुप व शिवभक्ती ग्रुप, पोलादपूर शहरातील एकता गु्रप, सहेली ग्रुप, लावण्या ग्रुप तसेच कांचनताई बुटाला, शर्मिला बुटाला व सुप्रिया शेठ ग्रुप, तुर्भे येथील सोमेश्वर ग्रुप, महाड येथील सृष्टी ग्रुप यांच्यासह सात महिलांनी एकेरी दुहेरी नृत्यस्पर्धेमध्येही सहभाग घेतला. स्पर्धेचे परिक्षण कोरियोग्राफर प्राची शिर्के यांनी केले.

यावेळी नृत्यस्पर्धेमध्ये आर्या लवंगारे हिला प्रथम, साक्षी मोरे हिला द्वितीय, ऐश्वर्या आणि काजोल लवंगारे यांना तृतीय तर प्राची सुर्वे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले. परिक्षक कोरियोग्राफर प्राची शिर्के यांनी यावेळी कांचनताई बुटाला, शर्मिला बुटाला व सुप्रिया शेठ यांच्या बिनधास्त नृत्यासाठी विशेष पारितोषिक जाहिर केले. मंगळागौरी स्पर्धेमध्ये पोलादपूर येथील सहेली ग्रुपला विजेता ठरविल्यानंतर एकता ग्रुपला उपविजेता घोषित करण्यात आले. यावेळी दिवीलच्या श्रीशक्ती ग्रुपला तिसरा क्रमांक जाहिर करण्यात आला तर तुर्भे येथील सोमेश्वर ग्रुप आणि पोलादपूर येथील लावण्या ग्रुपला उत्तेजनार्थ पारितोषिक जाहिर करण्यात आले.

मंगळागौर नृत्यामध्ये महिलांनी दिलखेचक अदा सादर केल्यानंतर महिला प्रेक्षकांनी शिटया आणि टाळयांसह आरोळया देत प्रोत्साहन दिले गेले. अतिशय जल्लोषमय वातावरणात झालेल्या या मंगळागौर आणि नृत्यस्पर्धेच्या आयोजनावेळी प्रत्येक सादरकर्त्या महिला स्पर्धकांनी प्रतिमा अभंग जाधव यांचे आवर्जून आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.