Press "Enter" to skip to content

बोर्ली येथील अंजुमन हायस्कुल येथे माजी सरपंच इम्तियाज दळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण

सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆

मुरूड तालुक्यातील बोर्ली येथील अंजुमन इस्लाम हायस्कुल येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्याचा मान बोर्ली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच इम्तियाज दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.

भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५वर्षे पूर्ण झाली आहे.या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी ध्वजारोहण करण्याचे भाग्य हे मला मिळाले असे माजी सरपंच इम्तियाज दळवी यांनी सांगितले.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक हनिफ पठाण,शिक्षक शिकेत्तर कर्मचारी वृंद बाबू छापेकर ,ग्रामस्थ उपस्थित होते.

अंजुमन इस्लाम हायस्कूल,मुरूड जंजिरा या संस्थेचे बोर्ली येथे विद्यालय आहे.या विद्यालयात बोर्ली मांडला पंचक्रोशीतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.