सुरक्षित पकडून दिले जीवनदान..
सिटी बेल लाइव्ह / खांब/रोहा (नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील खारी – काजुवाडी येथील सर्पमित्र उमेश काळे यांनी स्वतःच्या घरात पहाटेच्या सुमारास गडद रंगाचे चट्टेपट्टे असणाऱ्या अजगर सापाला पकडून जीवदान दिले आहे.
उमेश यांची आई उमेशला फस्ट शिफ्टचे डब्बा करण्यासाठी पहाटेच्या सुमारास ऊठली असता कोणत्यातरी प्रकारचे साप निदर्शनात आल्याने व कोंबड्यांच्या खुरड्यामध्ये कोंबड्यांचा कलकलाट ऐकू आल्याने त्यांनी त्वरित आपला मुलगा उमेश याला उठविले.सर्पमित्र उमेश याने क्षणाचा विलंब न करता केवळ काही मिनिटांमध्येच कोंबड्याच्या खुरड्याकडे धाव घेतली आणि पाहतो तर
अजगराने चार कोंबडीची पिल्ल फस्त केली होती.अशावेळी मोठ्या चतुराईने व शिताफीने उमेशने अजगर सारख्या सापाला पकडून जीवनदान दिले.
सर्पमित्र उमेश काळे यांनी तत्परता दाखवून त्वरित अजगर सापाला पकडून स्वतःच्या आईला दिलासा दिल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सर्पमित्र उमेश काळेला साप पकडण्यासाठी खुप ठिकाणी बोलावले जाते व क्षणाचाही विलंब न करता तोही साप पकडण्यासाठी त्वरीत जाऊन सापांना पकडून सुरक्षितरित्या सोडून जीवदान देत आला आहे. त्याने आतापर्यंत जवळ जवळ दीडशेहून अधिक विषारी व बिनविषारी साप पकडून त्यांना जीवनदान दिले आहे.






Be First to Comment