पोलीसांनी श्रमदान करुन भरले
खालापूर फाटा ते शिळ फाटा रस्त्यावर पडलेले खड्डे
सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
खालापूर फाटा ते शिळ फाटा रस्त्याची दुरावस्था निर्माण झाल्यामुळे या मार्गावरून प्रवास करतांना जिव मुठीत घेवून प्रवास करावा लागत असल्यामुळे या रस्त्यावरील पडलेले खड्डे भरण्यासाठी खालापूर पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षक बाळा रघुनाथ कुंभार यांने नव्याने पदभार स्विकारले असून त्यांनी पुढाकार घेवून आपल्या सहकार्या सोबत जावून रस्त्यावर पडलेले खड्डे भरल्यामुळे भरल्यामुळे खाकी वर्दितही माणुसकीचे रुप पहावयास मिळाले.
तालुक्यातील बाजार पेठेना जोडलेल्या रस्त्याची दुरवस्था निर्माण झाली असून या मार्गावरून शेकडो वहानांची रेलचेल सुरु असते.शिवाय गणपती उत्सव काही दिवसात येत असल्यामुळे त्यांना या खड्यांचा सामना करावा लागत असल्यामुळे.शिवाय गणेश भक्तांना सुखरुप आपल्या घरी जाता यावे या उदात्त विचारांतून खड्डे भरण्यात आल्यांचे पोलीस कर्मचारी यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
यावेळी पोह नितीन शेडगे,पोह रमेश उघडा, मपोना सोनम शेळके,मपोना लतिका गुरव,पोशि समिर पवार अदि उपस्थित होते.








Be First to Comment