शासनाने अनेकांना नुकसान भरपाई नाकारली !
सुनील गोगटे यांची भरपाई मिळण्याची मागणी
सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे #
जून महिन्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडसहित कर्जत तालुक्यातील गोरगरीब नागरिकांच्या घरांचे , शेतीचे , फळांच्या बागांचे अतोनात नुकसान झाले . आधीच कोरोनामुळे देशोधडीस लागलेल्या नागरिकांना चक्रीवादळाच्या तडाख्याने होत्याचे नव्हते केले . झालेल्या नुकसानीच्या भरपाईची वाट पहात असलेल्या वादळग्रस्तानवर शासनाच्या नियमांमुळे अन्याय झाला असून नुकसान झालेल्या सरसकट गोरगरीब नागरिकांना भरपाई मिळण्याची मागणी भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुनील गोगटे यांनी रायगडच्या पालकमंत्री ना . आदिती तटकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे .
कोरोना विषाणू महामारीच्या संकटात असलेल्या नागरिकांवर ३ जून २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण रायगडसहित कर्जत तालुक्यावर हल्ला केला . या हल्ल्याचा जास्त तडाखा रायगड जिल्ह्यातील लोकांना बसला, लोकांची घरांची छप्पर उडून गेली , भिंती पडल्या , पत्रे फुटले , नारळ – सुपारी बागा उद्धस्त झाल्या , शेतीचे नुकसान झाले . त्यातील काही नागरिकांना भरपाई मिळाली मात्र काही गोरगरीब नागरिकांची घरे सरकारी जागा , गावठाण , गुरचरण , फॉरेस्ट जागावर आहेत , अशामुळे त्यांना अनधिकृत शिक्का असलेली घरपट्टी आहे , म्हणून शासनाकडून नुकसान भरपाई नाकारण्यात आली आहे .
वास्तविक पहाता शासन प्रशासन त्यांचे कडून दुप्पट किंवा तिप्पट अनधिकृत घरपट्टी दंडात्मक शास्ती लावून वसुल करते . अशांना मग शासनाने निसर्ग नियमित झालेल्या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे .अशी माहिती प्रदेश चिटणीस सुनील गोगटे यांना मिळाली आहे .
याबाबतीत कर्जत तहसील कचेरीतून मिळालेल्या माहितीनुसार अनेकांना अद्यापी नुकसान भरपाई मिळाली नाही , तर वादग्रस्त नियम लादून गोरगरीब वादळग्रस्त नागरिकांवर अन्याय झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे रायगडच्या पालकमंत्री ना . आदिती तटकरे यांना आपण या गोष्टीचा सहानुभूती पुर्वक विचार करून गोरगरीब जनतेला त्यांचा गेलेला निवारा मिळवून देण्यासाठी अध्यादेश काढावा व सरसकट सर्वांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी वजा विनंती भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुनील गोगटे यांनी पत्र पाठवून केली आहे .






Be First to Comment