Press "Enter" to skip to content

गदिमांचे महाकाव्य “गीतगोपाल”दुर्लक्षित

ग .दि .माडगूळकर म्हणजेच गदिमा म्हटले की गीतरामायण आठवते गीतरामायणामुळे गदिमा अजरामर झाले यात शंकाच नाही .परंतु त्यांनी श्रीकृष्ण चरित्रावर आधारित गीतगोपाल हे महाकाव्य सुध्दा लिहिले परंतु "गीतरामायण"मुळे रसिकांचे डोळे इतके दिपले की त्यांनी "गीतगोपाल" कडे फारसे बघितलेच नाही. पंडित महादेवशास्त्री जोशी म्हणायचे "गीतरामायण" म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा असे मानले तर "गीतगोपाळ" म्हणजे त्याच्या भोवतीचे बहरलेले कुंजवन म्हणता येईल .तिथे प्रणाम करायचा इथे विहार ! "गीतरामायणाची" वाणी ही भारलेली आहे तर "गीतगोपाल" हा तिचा हळदीकुंकवाला जातांना गळ्यात रुठवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल . सुप्रसिद्ध संगीतकार सी . रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले "गीतगोपाल" स्वतः सी .रामचंद्र तसेच फैयाज , प्रमिला दातार , राणी वर्मा , बकुल पंडित , निलकंठ अभ्यंकर या मान्यवरांनी गायले आहे . मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती आहे व बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी गोपाळकाला आहे .भगवान श्रीकृष्णाचे भक्त हे दोन दिवस जल्लोष साजरा करत असतात त्यांनी गदिमांनी लिहिलेल्या "गीतगोपाल" हया महाकाव्याची दखल घ्यावी .व गदिमांना आगळी वेगळी आदरांजली वहावी . दहीहंडी आयोजन करणाऱ्या मंडळांनी गीतगोपाल हया महाकाव्याच्या वाचनाचे कार्यक्रम करावे त्यामुळे भगवान श्रीकृष्ण भक्तांवर झालेला अन्याय दूर तर होईल आणी गदिमा यांना आगळी वेगळी आदरांजली वाहिली जाईल .

दिलीप प्रभाकर गडकरी
“यषोदत अपार्टमेंट” विठ्ठलनगर, कर्जत (रायगड )४१०२०१

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.