अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी कर्जत मध्ये ध्वजारोहण
सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी कर्जत मध्ये ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी सगळ्याच ठिकाणी कर्जतकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उदंड प्रतिसाद दिला.
नगरपरिषदे मध्ये नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक शरद लाड, विवेक दांडेकर, नितिन सावंत, बळवंत घुमरे, सोमनाथ ठोंबरे, राहुल डाळींबकर, उमेश गायकवाड, संकेत भासे, हेमंत ठाणगे,नगरसेविका ज्योती मेंगाळ, भारती पालकर, सुवर्णा निलधे, विशाखा जिनगरे, प्राची डेरवणकर, संचिता पाटील, पुष्पा दगडे, मधुरा चंदन, स्वामिनी मांजरे, वैशाली मोरे, आदी सह नगरपरिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार महेंद्र थोरवे यांच्या पोसरी निवासस्थाना समोर मैदानावर आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तहसील कार्यालयात तहसीलदार विक्रम देशमुख, उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, कर्जत दिवाणी न्यायालयात महिला न्यायाधीश एस. आर. शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी महिला न्यायाधीश टी. एस. आपटे उपस्थित होत्या. कोंकण ज्ञानपीठ कर्जत महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य प्रा. रवींद्र कटके, अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. विलास पिल्लेवान, फार्मसी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मोहन काळे, माजी आमदार तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान संस्थेत अध्यक्ष मुकेश सुर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, नगरसेविका, इनरव्हील क्लब सदस्य,सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment