Press "Enter" to skip to content

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त कर्जत नगरपरिषदेच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

स्वातंत्र्य दिनाचा 75 वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून कर्जत नगरपरिषदेच्या वतीने गुणवंत विद्यार्थांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता.

नगरपरिषदेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, गटनेते नितिन सावंत, बांधकाम सभापती राहुल डाळींबकर, पाणी पुरवठा सभापती प्राची डेरवणकर,महिला बाल सभापती विशाखा जिनगरे, मागासवर्गीय कल्याण वैशाली मोरे, उपसभापती संचिता पाटील तसेच नगरसेविका, नगरसेवक उपस्थित होते.

व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी व बारावी मध्ये पहिल्या तीन क्रमांकात विशेष गुण मिळविलेल्या विविध शाळेच्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देवून कौतुक करण्यात आले.तर सुवर्ण महोत्सवी वर्षात श्रीनगर ते खारदुंगला ही सायकल मोहीम करून आलेल्या कर्जत मधील प्रकाश पटवर्धन, श्रीराम फाटक, अमित गुरव, भावेश ठक्कर, विशाल गायकवाड, गौरव फाटक यांना स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रविंद्र लाड यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.