Press "Enter" to skip to content

लवजी ग्रामस्थांनी राबविले स्वच्छता अभियान व रक्तदान शिबिर

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्याचप्रमाणे घर घर तिरंगा या अभियानाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका हद्दीतील लवजी ग्रामस्थांतर्फे गावात स्वच्छता अभियान व रक्तदान शिबिर कार्यक्रम घेण्यात आले.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला लवजी ग्रामस्थांनी त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांनी गाव व परिसरात हातात झाडू घमेले घेऊन स्वच्छता अभियान राबविले यात ज्येष्ठ नागरिक व तरुण सामील झाले होते.

त्याचप्रमाणे वासुदेव बळवंत फडके या शाळा क्रमांक आठच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी गावातील तरुणांनी रक्तदान शिबिरात भाग घेतला होता.या वेळी दिवसभरात काढलेल्या रांगोळी स्पर्धा व इतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकंदरीत या अभियानामुळे गावात उत्साहाचे वातावरण दिसून आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.