सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
श्री विभुषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज तसेच “परमपूज्य कानिफनाथ महाराज” यांच्या कृपाशीर्वादाने जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या आपत्कालीन मदत या उपक्रमाअंतर्गत मोफत ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
यावेळी प्रथम जगद्गुरूश्रींच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यानंतर ॲम्ब्युलन्सचे पुजन करण्यात आले.यावेळी पोलिस निरीक्षक सुधाकर ढाने, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र जाधव, उपसरपंच अजय तेजे, उपसरपंच दिगंबर पाटील, माजी उपसरपंच महेंद्र गवंडी,संतोष दरेकर, गणेश जाधव , पोलिस पाटील एकनाथ पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
आपत्कालीन सेवा म्हणून नागरिकांच्या सोयीसाठी अबुलन्स मिळाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.यावेळी नरेंद्राचार्य संस्थानाचे सुभाष लुडबे (मुख्यपीठ सहायक पीठ ),अनिल खारकर (जिल्हा निरीक्षक) प्रमोद परदेशी (जिल्हा अध्यक्ष ) ,कृष्णा खारकर (तालुका अध्यक्ष- पनवेल ), रमाकांत बंडा (तालुका अध्यक्ष उरण ),मनोहर म्हामुनकर ( ॲम्बुलन्स दक्षता अधिकारी),विजय म्हात्रे ( प्रोटोकॉल प्रमुख )स्व स्वरूप संप्रदाय संपूर्ण जिल्हा सेवा समिती, तालुका सेवा समिती पदाधीकारी, भक्त, शिष्य , साधक ,हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment