शबरी सेवा समिती, कर्जत शाखेच्यातर्फे तीन दिवसांचे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
शबरी सेवा समिती, कर्जत शाखेच्यातर्फे तीन दिवसांचे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार, जव्हार येथे शबरी सेवा समितीच्या ज्या कार्यकर्त्या शिवणक्लास घेतात अशा महिलांनी भाग घेतला होता.

या वर्गाचं सर्व नियोजन कर्जत येथील शबरी सेवा समितीच्यावतीने करण्यात आले होते. या वर्गात त्यांना साडीचा वनपीस, लहान मोठया प्रकारच्या पर्स, प्रवासी बॅग, साडी फोल्डर लहान मुलांची झबली, टोपरी, लंगोट, कुंची असे प्रकार शिकविण्यात आले,आठ महिला प्रशिक्षणाला उपस्थित होत्या.प्रकारच्या पर्सेस, साडी फोल्डर, प्रवासी बॅग हे प्रकार कापून,अस्तर तसेच चेन लावून शिवण्यास शिकविले.त्यांना होत असलेला आनंद त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत होता. वेळ अजिबात फुकट न घालविता त्या त्यांत काहीतरी नवं शिकण्याचा प्रयत्न करत होत्या.








Be First to Comment