Press "Enter" to skip to content

विजय आर्मी स्कूल चिखले येथे साहसी व क्रीडा प्रशिक्षण शिबीर संपन्न

सिटी बेल ∆ पनवेल ∆

छत्रपती श्री शिवाजी महाराजाची राजधानी असलेल्या रायगड जिह्यातील विजय आर्मी स्कूल व ज्यु. कॉलेज चिखले, पनवेल येथे छत्रपती शिवाजी महाराज नॅशनल मेमोरियल ट्रस्ट, नवी दिल्ली, शाखा – महाराष्ट्र व नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी व क्रिडा प्रशिक्षण संस्था तसेच विजय नाना स्पोर्ट्स एडवेंचर अँड रायफल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने साहसी व क्रिडा प्रशिक्षण शिबीर चे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी शाळेचे प्राचार्य एम के मराठे सर यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिरास सुरूवात केली. विद्यार्थ्याना प्रशिक्षण देण्या साठी उपस्थित विकास लाटे सर, रवींद्र पानकडे सर, अमोल आठवले सौरभ दराडे, दिपक जगदाळे सुमित आव्हाळे तसेच आश्रम शाळा चिखले चे शिक्षक राजेश राठोड सर, व्ही एल काटकर सर यांचे स्वागत शब्द सुमनांनीउप प्राचार्य एस पी पाटील सर यांनी केले.

प्रशिक्षणास अतिशय छान प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांसोबत शाळेचे कमांडंट पी व्ही आर कृष्णन सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सैनिक निदेशक संगणक निर्देशक या सर्वांनी विविध साहसी कौशल्य यांचे प्रशिक्षण घेऊन आनंद उपभोगला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.