सोळा वर्षाचे असताना गाठली होती अयोध्या
सिटी बेल लाइव्ह / खालापूर /मनोज कळमकर)
राममंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने 1992 साली कारसेवक म्हणून खालापूरातून सहभागी झालेल्या दिनेश फराट यांचा सत्कार करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी अयोध्येत राममंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.खोपोलीत देखील भूमिपूजनाचे औचित्य साधून अठ्ठावीस वर्षापूर्वी खालापूर तालुक्यातून कारसेवक म्हणून अयोध्येमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
अवघे सोळा वर्ष वय असताना शाळा सुटल्यानंतर घरी न जाता कारसेवकांमध्ये सामील होत दिनेश फराट अयोध्येत पोहचले होते.त्यांच्या समवेत त्यावेळी तालुक्यातून रमेश मोगरे, राजेंद्र येरूणकर,खोपोलीचे दिलीप पवार,मीनाताई बाम,राजेंद्र फक्के,विजयानंदन पाटील,विजय घरत,विजय कापङी,रविंद्र जैन सह अनेक कार्यकर्ते होते.पोलीसानी अङविण्यापूर्वी बाबरी पर्यंत पोहचल्याची आठवण दिनेश फराट यानी सांगितली.
चौक गावातून कै.अरूण आयरे यांचा मोठा ग्रुप देखील त्यावेळी पोहचला होता. राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमामुळे या आठवणीना उजाळा मिळाला असून या ऐतिहासिक घटनेचा एक भाग असल्याचा अभिमान वाटतो असे दिनेश फराट यानी सांगितले.






Be First to Comment