सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी #
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कळंबोली मंडळ शहर अध्यक्ष रविंशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कळंबोली मंडळ उपाध्यक्ष संदिप रामदास भगत यांच्या माध्यमातून कळंबोली बौद्ध वाडा येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कळंबोलीमध्ये मास्कचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या महामारीत जनता काकुळतीला आली आहे.असा बिकट परिस्थिती जनतेला दिलासा देण्याचे काम भाजपचे कळंबोली मंडळ उपाध्यक्ष संदिप भगत यांनी केले.
कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभुमीवर टाळेबंदी करण्यात आली होती या टाळेबंदीत कोणावरही उपासी राहण्याची वेळ येवू नये म्हणून लोकनेते मा. खासदार रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अहोरात्र मेहनत घेत रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून गरीब गरजू , बेघर, निराधारावर अन्नछत्र धरले होते. त्यांच्या विचाराने प्रभावित असलेले संदिप भगत यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसा निमित्त गुरूवारी ( दि ६ ) कळंबोली मधील सर्व नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी बौद्ध वाड्यात शेकडो झाडे लावण्यात आली.
यावेळी भाजपा कळंबोली अनुसुचित सेल मोर्चा अध्यक्ष रविंद्र जाधव, भाजपा कळंबोली अनुसुचित सेल मोर्चा सरचिटणीस राजू दळवी, भाजपा कळंबोली अनुसुचित सेल मोर्चा खजिनदार दिपक दुधावडे आदिवासी सेल मोर्चा अध्यक्ष राकेश नाईक, सधिर भगत आदिसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.






Be First to Comment