Press "Enter" to skip to content

संस्कार भारती कर्जतच्यावतीने कराओके गायन स्पर्धा संपन्न

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

संस्कार भारती कर्जतच्यावतीने कराओके गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,विठ्ठलनगर येथील सुनील गोगटे यांचे निवासस्थानी ही गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत मधील कराओके गायन क्षेत्रातील सुप्रसिद्ध नांव संदीप पाटील हे उपस्थित होते.

नेहमीच्या प्रथेप्रमाणे प्रथम नटराज पूजन व दीपप्रज्वलन संस्थेचे उत्तर रायगड अध्यक्ष पांडुरंग गरवारे, प्रमुख पाहुणे संदीप पाटील, सुनिल गोगटे, माजी पदाधिकारी उर्मीला जोशी, स्पर्धेचे परिक्षक संतोष माडगूळकर व स्नेहा गोगटे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ध्येयगीत सुरेखा शितोळे,दिनिती सावंत,सायली कुंभार, ज्योती कडू,स्वप्ना सोहोनी व प्राजक्ता गरवारे यांनी सादर केले.

सर्वप्रथम संस्थेचे माजी पदाधिकारी व नाट्य कलावंत प्रकाश चौथाई व नाट्यकर्मी प्रदीप पटवर्धन यांस श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर स्पर्धा सुरू झाली. एकुण 22 स्पर्धकांनी मराठी व हिंदी गाणी सादर केली. सर्वांनी खूपच सुंदर सादरीकरण केले म्हणून परिक्षक स्नेहा गोगटे व संतोष माडगूळकर यांनी प्रथम तीन क्रमांकांसह तीन उत्तेजनार्थ बक्षिसे जाहीर केली. प्रथम क्रमांक- नम्रता देवरे,द्वितीय क्रमांक – प्राची साळोखे व तृतीय क्रमांक ऋतिका पाठारे यांनी मिळवला तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके विवेक पांचाळ, भाविका उतेकर व मानस भोपतराव यांना मिळाले.

बक्षिस समारंभ 15 ऑगस्ट रोजी वंदेमातरम् गौरवगान या कार्यक्रमात होणार आहे.संस्कार भारतीच्या आजी व माजी सभासदांनी तसेच संगीत प्रेमींनी कार्यक्रमास उपस्थित होते, संस्कार भारती, कर्जतच्या अध्यक्षा भारती म्हसे यांनी आभार प्रदर्शन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.