शारदा मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांचे रक्षाबंधन
सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
कोरोना महामारीत सर्व बंद होते, मात्र आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि नगरपरिषद सफाई कर्मचारी फ्रंट लाईनवर जीवाची बाजी लावून काम करत होते, अश्या अधिकारी, कर्मचारी यांना शारदा मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला व सामाजिक बांधिलकी जपली आहे.

रक्षाबंधन हा बहिण भावाच्या नात्यातील प्रेम वृद्धिंगत करणारा सण आहे,समाजात अशीही काही माणसं आहेत की जी कोणत्याही ही नात्यात नसताना इतर अनेक लोकांना विविध प्रकारे सुरक्षित ठेवत असतात त्यांचे रक्षण करत असतात अशा लोकांमुळे आपण सुरक्षित आहोत कोरोना प्रादुर्भावाचा च्या काळात या गोष्टी आपल्याला प्रकर्षाने जाणवल्या सेवाभावी वृत्ती चे व्रत स्वीकारलेल्या समाजातील आरोग्य सेवक, पोलीस कर्मचारी आणि नगरपरिषद सफाई कर्मचारी या घटकांचे आभार मानून त्यांच्या कार्याप्रती आपली संवेदना व आदर व्यक्त करता यावा यासाठी शारदा मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली किसवे, छाया नगरकर,धनश्री कानडे, कुमारी अस्मिता ठाणगे आदी शिक्षक व विद्यार्थिनीनी अधिकारी आणि कर्मचारी यांना राख्या बांधल्या व रक्षाबंधन सण साजरा केला.








Be First to Comment