Press "Enter" to skip to content

घोटकॅम्प येथील नदीत थरारक रेक्स्यु ऑपरेशन

नदीमध्ये अडकलेल्या दोन कुत्र्यांचे अग्निशामक दलाच्या जवानांनी वाचवले जीव

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆

एकीकडे मुक्या प्राण्यांना मारहाण करण्याच्या घटनेत वाढ होत असताना नदीमध्ये अडकलेल्या दोन कुत्र्यांचे जीव फायर ब्रिगेडच्या जवानांनी वाचवले आहेत. घोटकॅम्प येथून वाहणाऱ्या नदी पात्रात हा प्रकार घडला आहे.

अभिमन्यू गोरे नावाचे इसम कामावरून घरी जात असताना त्यांना एका मच्छी विक्रेत्याने, समोरच्या नदीमध्ये दोन कुत्रे अडकल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावेळी अभिमन्यू गोरे यांनी खारघर अग्निशमन केंद्रात फोन करून संबंधित माहिती दिली.

विशेष म्हणजे, काही वेळातच फायर ब्रिगेडची टीम घटनास्थळी दाखल झाली. फायर ब्रिगेडच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करत त्या दोन कुत्र्यांना बाहेर काढून जीवदान दिले.

खारघर अग्निशमन दलाच्या प्रवीण शेंद्रे, व्हि. एस. परदेशी, ए. एस. ससाणे, एस.‌ वाय गावकर, जे. सी. राजपूत, आर. एन. म्हात्रे आदींच्या टीमने ही कामगिरी केली. याबाबत अभिमन्यू गोरे यांनी त्यांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.