Press "Enter" to skip to content

माथेरान नगरपालिकेचे ध्वज विक्री केंद्र सुरू

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिगंबर चंदने यांनी विकत घेतला पहिला ध्वज

सिटी बेल ∆ माथेरान ∆ संजय गायकवाड ∆

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत माथेरान नगरपालिकेने विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून दि. 8 पासून ध्वज विक्री केंद्र सुरू केले असून येथील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर चंदने यांनी पहिला ध्वज घेण्याचा मान मिळवला आहे.

माथेरान गिरिस्थान नगरपालिकेकडून हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. हा उपक्रम 9 तारखेपासून सुरू होत असून त्याअगोदर ध्वज वितरण आणि विक्री केंद्राचे अनावरण करण्यात आले. मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भणगे यांच्या हस्ते येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिगंबर चंदने पहिला ध्वज विक्रीने या केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ लिपिक प्रवीण सुर्वे,अभियंता स्वागत बिरंबोळे, लेखापाल अंकुश इचके, स्वच्छता अधिकारी अभिमन्यू येळवंडे,अन्सार शेख,आरोग्य विभागाचे सदानंद इंगळे,शिपाई उमेश मोरे, ज्ञानेश्वर सदगीर,स्नेहा साखळकर, वाचनालय प्रमुख पूजा शिंदे तसेच स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

याबाबत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिगंबर चंदने म्हणाले की पहिला ध्वज घेण्याचा मान मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत शासनाने दिलेल्या ध्वज संहितेचे पालन करून हा उत्सव साजरा करणार तर मुख्याधिकारी सुरेखा भणगे-शिंदे म्हणाल्या की करसनदास मुळजी ग्रंथालयात ध्वज विक्री केंद्र सुरू केले आहे. माथेरान मध्ये एक हजार ध्वज विक्रीस ठेवले आहेत.जास्तीत जास्त लोक ध्वज घेतील असा अंदाज आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.