सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे #
नगरपरिषदेच्या आवारात देणगी म्हणून देण्यात आलेली एक रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने पडून आहे याचं गाडीची दुरुस्ती करून तिचा सदुपयोग शववाहिनी म्हणून करण्यात यावा अशी मागणी स्थानिकांमधुन केली जात आहे.
माथेरान मध्ये मृत व्यक्तीला स्मशानभूमीत नेण्यासाठी सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनिंग मुळे खूपच त्रासदायक बनलेले असून अनेकदा मयताला खांदेकरी सुध्दा अल्प प्रमाणात असतात त्यामुळे दूरवर असलेल्या हिंदू स्मशानभूमीत मृतदेह नेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच याकामी प्रशासनाकडून अद्ययावत सेवासुविधा उपलब्ध नसल्याने वेळप्रसंगी १०८ या रुग्णवाहिकेचा वापर मृतदेह स्मशानभूमीपर्यंत वाहून नेण्यासाठी नाईलाजाने करावा लागत आहे.
आजवरच्या काळात नगरपरिषदेच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लावण्यासाठी संबंधीत लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत.खराब रस्त्यांमुळे रुग्णवाहिकेत नेहमीच तांत्रिक बिघाड होत असतो त्यामुळे काही दानशूर व्यक्तींच्या वतीने तसेच खासदार मंडळींच्या निधीतून इथे दरवेळेस रुग्णवाहिका देणगी दाखल दिली जात आहे त्यामुळे नागरिकांना तसेच पर्यटकांना सुध्दा या सेवेचा लाभ मिळत आहे.
काही वर्षांपूर्वी देणगी म्हणून देण्यात आलेली एक रुग्णवाहिका नगरपरिषदेच्या दवाखान्यात उपचाराविना पडून आहे. याच गाडीची सुयोग्य पद्धतीने दुरुस्ती केल्यास शववाहिनी म्हणून उपयोगात आणता येईल त्यासाठी लोकप्रतिनिधींनी,संबंधित अधिकारी वर्गाने यासाठी सकारात्मक विचार केल्यास सोयीस्कर होऊ शकते अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.






Be First to Comment