Press "Enter" to skip to content

पोलीस पथकाला आयुक्तांतर्फे प्रशस्तिपत्र प्रदान

लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी करणार्‍या आरोपीस खांदेश्‍वर पोलिसांकडून अटक

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆

घराचा बंद दरवाजा तोडून बेडरुममधील कपाटात ठेवलेले 13 लाखाचे दागिने चोरणार्‍या आरोपीस खांदेश्‍वर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

मंगेश रामचंद्र पुरुषन यांचे रुम नं.102, अष्टविनायक ओनर्स, से.नं.18, नवीन पनवेल येथे घर असून ते काही कामानिमित्त घराबाहेर गेले असता बंद घराचा दरवाजा, कोयंडा तोडून 13 लाखाचे सोन्याचे, चांदीचे दागिने तसेच रोख व युरो परदेशी चलन असे चोरी करून नेले होते.

सदर गुन्हा खांदेश्‍वर पोलीस ठाण्यामध्ये दाखल होताच पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सह.आयुक्त जय जाधव, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहा.पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे व सपोनि समीर चासकर व पथकाने सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपस करून आरोपी अलीमुद्दीन अब्दुल हमीद (47), साजीद खुबनसीब (27), मोहम्मद रमजानी मोहम्मद हनीफ या आरोपींना गोकुळपुरी पोलीस ठाणे नवी दिल्ली येथून अटक केली. त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेल्यापैकी 9 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर आरोपींनी अशाच प्रकारे आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता पोलिसांना असून त्याअनुषंगाने तपास सुरू आहे.

लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी करणार्‍या आरोपीस खांदेश्वर पोलिसांकडून अटक करण्यात आले होते याच उत्कृष्ट कामगिरी बद्दल नवीमुंबई पोलीस आयुक्तांच्या हस्ते सर्व कर्तव्यदक्ष अधिकारी यांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. यात वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे, गलांडे मॅडम, एपीआय समीर चासकर,पीएसआय किरण वाघ, पीएसआय बालाजी पावणे, पो हवालदार महेश कांबळे,पो हवालदार सारंग सुदर्शन,
पो ना राजेंद्र कुवर, पो ना भाऊराव बाचकर, पो ना कैलास म्हात्रे यांचा समावेश होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.