Press "Enter" to skip to content

पनवेल तालुक्यातुन विवाहिता बेपत्ता

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆

पनवेल तालुक्यातील हौशाची वाडी, मोठी धामणी जवळ राहणारी एक विवाहिता राहत्या घरातून कोणाला काही एक न सांगता कुठेतरी निघून गेल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

सौ. जयवंती नरेश मेंगाळ (वय-२४), उंची ४ फूट ६ इंच, रंग सावळा, केस लांब काळे, डोळे काळे, बांधा सडपातळ असून अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेला आहे. तसेच कपाळावर मध्यभागी गोंदलेले, गळ्यात मणी मंगळसूत्र व सॅंडल आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे फोन-०२२२७४५२४४४ किंवा पो.ना. सतिश मुळे यांच्याशी संपर्क साधावा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.