Press "Enter" to skip to content

आमदार महेंद्र दळवी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

डायलेसिस करण्यासाठी जाणाऱ्या रुग्णासह सहकाऱ्यांस मोफत एसटी बस सवलत मिळावी : आमदार महेंद्र दळवी

सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆

रायगड जिल्हयासाहित महाराष्ट्रात अनेक मूत्रपिंड निकामी झालेले रुग्ण हे मोठ्या प्रमाणात आहेत.त्यांना रक्त शुद्धीकरण( डायलेसिस ) करण्यासाठी प्रवास करावा लागतो त्यावेळी त्यास आणि त्याच्या सहकारी यांस एसटी बसचा प्रवास मोफत मिळावा यासाठी ।अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

डायलेसिस (रक्तशुद्धीकरण) ही दीर्घकाळ चालणारी उपचार पद्धत असल्याने गरीब कुटुंबातील रुग्णांना डायलेसिस सेंटरपर्यंत जाण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. डायलेसिस सुविधा ही मोठ्या शहरातच असल्याने महाराष्ट्राच्या अनेक तालुक्यातून मुंबई, पुण्यासारख्या सुविधा असणाऱ्या शहरापर्यंत प्रवास करावा लागतो.

दर आठवड्याला खासगी वाहनातून करावा लागणारा प्रवासाचा खर्च ग्रामीण भागातील नागरिकांना न परवडण्यासारखा आहे. या खर्चातून दिलासा देण्यासाठी एसटी महामंडळा मार्फत सुविधा सुरु करावी, अशी मागणी आ. महेंद्र दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

आपले सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार असून आपण महाराष्ट्रातील जनतेचे कुटुंब प्रमुख ही सुविधा सुरु करणे गरजेचे असल्याचे म्हणणे आ. महेंद्र दळवी यांचे आहे. या सुविधेमुळे राज्यातील हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी ग्रामीण भागात डायलेसिस सुविधा नसल्याने अनेक रुग्णांना डायलेसिस सेंटरपर्यंत आठवड्यातून दोन ते तीन वेळा जावे लागते. गरीब कुटुंबातील रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना हा खर्च न परवडण्यासारखा असल्याने राज्य सरकारने अशा रुग्णांचा आणि त्याच्या सोबत जाणाऱ्या एका व्यक्तीचा एसटी प्रवास मोफत मिळाल्यास या रुग्णांना चांगली आधार उपलब्ध होईल, असे अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.