तांबडी येथील पीडित मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील मराठा संघटना आक्रमक
सिटी बेल लाइव्ह / धाटाव (शशिकांत मोरे)
रोह्यात तांबडी गावातील मराठा समाजाच्या कुटुंबातील १४ वर्षाच्या लेकीवर काही नराधमांनी लैंगिक अत्याचार करून तिची निघृण हत्या केल्याच्या घटनेचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्र भर पसरू लागले आहेत.
या गंभीर विषयाची दखल घेत महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्च्या सह सर्वच मराठा संघटनांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना संबधित आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन दिले आहेत.एकंदरीत या घटनेमुळे महाराष्ट्रातील मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत.
तांबडी येथील भूषण बावकर यांनी मुंबईत राहणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा सह इतर मराठा संघटनेच्या पदाधिकारी वर्गाला सदर घटनेबाबत माहिती दिली.दरम्यान या घटनेबाबत सर्वांनीच गांभीर्याने घेऊन संबंधितांनी या घटनेचा निषेध करीत जिल्हावार निवेदन देण्यात आली.एकंदरीत या घटनेमुळे महाराष्ट्रातील मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत.
त्यातच सदर घटनेच्या तपासात अवघ्या १२ तासात विभागीय पोलिस अधिकारी श्री.सुर्यवंशी यांनी आरोपींना अटक केली असताना त्यांच्या कडून तपासाचे अधिकार काढण्यात आले ही बाब संशयास्पद असल्याने याबाबत लवकरच शिवसेनेच्या आमदारांना घेऊन मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी सांगितले.






Be First to Comment