Press "Enter" to skip to content

राख्यांनी बहरली बाजारपेठ

डिझायनर राख्यांना मागणी, राख्यांचे ट्रेण्ड बदलले

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆

बहीण – भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन हा सण एक आठवड्या येवून ठेपल्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत निरनिराळय़ा रंगीबेरंगी राख्यांनी दुकाने सजली आहेत. मुलींसह महिलावर्ग बाजारपेठेत राख्या खरेदी करीत आहेत.बहुतेक चाकर -मालक बाजार पेठांमध्ये राखी खरेदी करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.

गेल्या वर्षापासून आलेला कोरोना सारख्या या विषाणू सध्या चढता उतरता आलेख करीत असल्यामुळे सातत्याने कोरोनाच्या आजारांची भिती यामुळे बहीणीला रक्षाबंधन साजरा करण्यात अडचण निर्माण होत असल्यामुळे या वर्षी सर्व सुरळीत सुरु असून एक आठवड्या मध्ये येत असलेल्या रक्षा बंधन हा सण साजरा करण्यासाठी महिला वर्ग बाजार पेठत राखी खरेदि करीत असल्याचे दृश्य पहावयास मिळत आहे.

दरवर्षाप्रमाणे यंदाही रक्षाबंधनच्या दहा दिवस अगोदर बाजारात राख्या विक्रीला आल्या आहेत.तसेच बाजारपेठत यंदा वेगवेगळ्या रंगांच्या व आकारांच्या राख्या बाजारात आल्या आहेत.कार्टुन कॅरॅक्टर्सच्या राख्या छोट्या दोस्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. महिला चांदीचे लेपन केलेल्या, मेटलच्या, कृत्रिम हिरे लावलेल्या, रुद्राक्ष, स्वस्तिक, ओम अशी धार्मिक चिन्हे असलेल्या राख्यांना पसंती देत आहेत.

सर्वांनाच इतरांपेक्षा वेगळी राखी हवी आहे, अशी माहिती राखी विक्रेते यांनी दिली.भारतीय राख्यांच्या तुलनेत त्यांचे भावसुद्धा खिशाला परवडतील असेच असल्याने देशी उत्पादनांना त्यांच्याशी स्पर्धा करावी लागत आहे.दूरवरच्या भाऊरायाला राखी पाठविण्यासाठी पूर्वी ताई-माईंची पोस्टात मोठी गर्दी पाहायला मिळायची. आता ती जागा कुरिअर कंपन्यांनी घेतलेली आहे.परंतु,यंदा बाजारात राख्यांचे विविध प्रकार आले असल्यामुळे त्यांची मागणी तेवढीच वाढली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.