सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकुर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भारतीय जनता पार्टी कर्जत आणि उपजिल्हा रुग्णालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमानाने बुस्टर डोस लसीकरण शिबीर सुनील गोगटे यांचे जनसेवा कार्यालयात आयोजित करण्यात आले होते, यावेळी 153 कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन डोस देण्यात आले.

सर्व नागरिकांना सहजतेने लस उपलब्ध व्हावी या उद्देश ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उपजिल्हा रुग्णालयांच्या डॉ.संगीता दळवी आणि त्यांचे सहकारी यांनी लसीकरण केले.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, उपनगराध्य अशोक ओसवाल, सुनील गोगटे, दिनेश सोलंकी, विजय कुलकर्णी, मारुती जगताप, मिलिंद खंडागळे, समीर घरलुटे, प्रशांत उगले, शिरीष कदम, दिनेश गणिगा, श्रीनिवास राव,अभिजित पटेल, राहुल मसणे, अभिषेक तिवारी, सर्वेश गोगटे, आदित वांजळे, रवींद्र जाधव, दर्पण घारे, विश्वनाथ लोखंडे, गायत्री परांजपे, स्नेहा गोगटे, शर्वरी कांबळे, प्रीती तिवारी, सोनिया गरवारे, पुनम डेरवणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment