सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
कर्जत नगरपरिषद कार्यालय येथे ध्वज वितरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक प्रभागात ध्वज मिळण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. स्वयंसेवी संस्था, मंडळ, इच्छुक स्वयंसेवकांनी, सर्व नागरिकांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि तिरंग्याचा सन्मान करावा असे आवाहन नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी केले आहे.

कर्जत नगर परिषद घरो घरी तिरंग या मोहिेअंतर्गत कामाचा आढावा घेणे करिता बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, सभापती राहुल डाळींबकर उपस्थित होते, त्यांनी कर्मचाऱ्यांकडून कामाचा आढावा घेवून पुढील रूपरेषा ठरवली आहे.त्यानंतर नगरपरिषद कार्यालयात ध्वज वितरण कक्ष सुरू करण्यात आला आहे.








Be First to Comment